जळगाव पोलिस दलाची वेबसाईट अपडेटच्या प्रतिक्षेत

जळगाव : जळगाव पोलिस दलाची वेबसाईट गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात दुर्लक्षीत झाली आहे. वेबसाईटची रचना आणि अपडेट बघून ऑनलाईन व्हिजीटर्स संबंधीत संस्थेची अथवा कार्यालयाची डिजीटल प्रतिष्ठा ठरवत असतात. जळगाव पोलिस दलाच्या वेबसाईटवर केवळ जिल्ह्याच्या सर्वोच्च पातळीवरील तिन अधिका-यांचे अपडेट तेवढे व्यवस्थित ठेवले जाते. इतर अधिका-यांची नावे आणि फोटो याकडे कुणाचे फारसे लक्ष नसते. संबंधीत अधिकारी, कर्मचारी आणि ज्या एजन्सीला या वेबसाईटच्या देखभाल, दुरुस्तीचे काम दिले आहे त्या एजन्सीने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

उप विभागीय पोलिस अधिकारी या नावापुढे तर जळगाव तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचा फोटो दिसून येतो. एमआयडीसी पोलिस स्टेशन निरीक्षकांच्या जागी या जिल्ह्यातून बदलून गेलेले पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांचा फोटो दिसतो. सहायक पोलिस निरीक्षक निता कायटे या तर दोन ठिकाणी नियुक्तीला असल्याचे दिसून येत आहे.

पोलिस दलातून निवृत्त झालेले पोलिस निरीक्षक बळीराम हिरे आजही शनीपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक असल्याचे वेबसाईटवर दिसत आहे. जिल्हापेठ पोलिस स्टेशनमधून पारोळा येथे बदलून  गेलेले पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे आजही जळगाव पोलिस दलाच्या वेबसाईटवर जिल्हापेठचे पोलिस निरीक्षक म्हणून कारभार बघत आहेत.

भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पीआय दिलीप भागवत हे व्हाया कंट्रोल टू शनीपेठ  पोहोचले तरी देखील वेबसाईटवर त्यांची नियुक्ती भुसावळ बाजारपेठलाच आहे. पहुर पोलिस स्टेशनचे विद्यमान पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे आजही भुसावळ शहरचे पोलिस निरीक्षक आहेत. मुक्ताईनगर येथून धरणगावला गेलेले राहुल खताळ आजही मुक्ताईनगरचे पीआय म्हणून वेबसाईटवर नेमणूकीला दिसत आहेत. बोदवड येथून भुसावळ बाजारपेठला नेमणूक झालेले राहुल गायकवाड आजही बोदवड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक म्हणून जळगाव पोलिस दलाच्या वेबसाईटवर दिसतात.

पुर्वी यावल येथे असलेले पीआय सुधीर पाटील आजही यावल येथेच असल्याचे दिसून येते. पहुरचे तत्कालीन पीआय अरुण धनवडे कंट्रोल टू जिल्हापेठ पोहोचले. मात्र वेबसाईटवर ते आजही पहुरलाच कार्यरत आहेत. सहायक पोलिस निरीक्षक निता कायटे या तर कासोदा आणी पिंपळगाव हरेश्वर या दोन पोलिस स्टेशनचा कारभार बघत असल्याचे वेबसाइटवर दिसते. धरणगावचे तत्कालीन पोलिस निरीक्षक व सध्या मुक्ताईनगरला असलेले पोलिस निरीक्षक शंकर शेळके अजून धरणगावलाच असल्याचे दिसून येते. पारोळ्याचे तत्कालीन पीआय संतोष भंडारे सध्या कंट्रोलरुम व्हाया जिल्हापेठ आले आहेत. मात्र वेबसाईटवर ते पारोळा येथील कामकाज सांभाळत असल्याचे दिसून येते. केवळ बड्या तिन अधिका-यांची नावे आणि फोटो याकडे गांभिर्याने लक्ष दिले जाते आणि पोलिस स्टेशन पातळीवरील अधिकारी वर्गाच्या नाव आणि फोटोकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येते. जळगाव पोलिस दलाच्या वेबसाईटवर वेळच्या वेळी बदल होण्याची गरज व्यक्त होत आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here