जळगाव : तमाशाच्या फडात नोटा ओवाळून नाचणा-या पोलिस कर्मचा-यास जळगाव पोलिस अधिक्षकांनी निलंबित केले असून या घटनेने जळगाव पोलिस दलात खळबळ माजली आहे. गेल्या काही दिवसात पोलिस खात्यातून निलंबन होणारा हा दुसरा कर्मचारी आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक किरणकुमार बकाले यांची फोनवरील संभाषणाची ऑडीओ क्लिप व्हारयल झाल्यानंतर त्यांचे निलंबन झाले. ती ऑडीओ क्लिप व्हायरल करणा-या सहायक फौजदाराचे देखील निलंबन झाले.