विज मंडळाची तार चोरुन नेणा-या तिघांना अटक

On: September 19, 2022 5:14 PM

जळगाव : विज वितरण कंपनीची सुमारे तिनशे मिटर तार चोरुन नेणा-या तिघा चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. प्रविण ज्ञानेश्वर पाटील, शुभम ओमप्रकाश शर्मा आणि पंजक सुकलाल राठोड अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. यापुर्वी देखील या तिघांना पाचशे मिटर अल्युमिनीयम तार चोरुन नेतांना अटक करण्यात आली होती.

सुभाष गायधनी हे विज वितरण कंपनीत नोकरीला असून 18 सप्टेबर रोजी उमाळा शिवारात पेट्रोलिंग करत होते. पेट्रोलिंग दरम्यान शुभम लॉजिस्टीक कंपनी नजीक शेत शिवारात तिघे चोरटे विज मंडळाची तिनशे मिटर तार चोरुन नेतांना त्यांना आढळून आले. चोरी करतांना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गु.र.न.698/22 भा.द.वि. 379, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केल्यानंतर तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांना तिन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस नाईक मुदस्सर काझी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment