मुलीला पळवून लग्न केल्याचा राग मुलाच्या वडिलांना बांधले झाडाला केली मारहाण

On: August 11, 2020 7:53 PM

पंढरपूर : धार्मिक स्थळ असलेल्या पंढरपुरात एका घटनेने मोठी खळबळ माजली आहे. मुलीला पळवून नेत तिचे लग्न केल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या वडिलांना दोरीने झाडाला बांधून ठेवले. एवढ्यावरच संतप्त नातेवाईक थांबले नाही तर त्यांनी मुलाच्या वडीलांना मारहाण देखील केली.

भाळवणी गावातील एका तरुणाचे गावातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंधातून दोघांनी पळून जावून लग्न करण्याचा निर्णय घेतला. संतपाच्या भरात मुलीच्या नातेवाईकांनी थेट मुलाच्या घरावर हल्लाबोल  केला. त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या वडिलांना घरापासून मारहाण करत चौकातील झाडाजवळ आणले. तेथील झाडाला दोरीने बांधून त्यांना मारहाण करण्यात आली.

दरम्यान इतर गावक-यांनी हस्तक्षेप करत मुलाच्या वडीलांची सुटका केली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. मारहाण करणा-या मुलीच्या नातेवाईकांना ताब्यात घेत पुढील कारवाई सुरु करण्यात आली. पुढील कारवाई मंगळवेढा पोलिस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment