सेवानिवृत्त मुख्याध्यापकाकडे झालेल्या घरफोडी प्रकरणी गुन्हा

On: September 26, 2022 3:53 PM

जळगाव : सेवानिवृत्त मुख्याध्यापकाच्या घरी झालेल्या घरफोडी प्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण गरबड चौधरी रा. सदाशिव नगर जुना खेडी रोड जळगाव या मुख्याध्यापकाच्या घरी 67 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला आहे. 10 ऑगस्ट ते 24 सप्टेबर 2022 या कालावधीत बंद अवस्थेतील घराचा मुख्य सेफ्टी कोंडा तोडून लाकडी दरवाजाचे सेंटर लॉक तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याचे उघडकीस आले आहे.

27 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दोन वाट्या असलेले 13 ग्रॅम वजनाचे सुमारे चाळीस वर्षापुर्वी लग्नात घेतलेले मंगळसुत्र, 25 हजार रुपये किमतीचे सोन्याचे 5 ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या आणि 5 हजार रुपये रोख असा ऐवज चोरुन नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनीपेठ पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार रघुनाथ महाजन पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment