मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोने व चांदीचे भाव सतत वाढत होते. वाढत असलेल्या सोने-चांदीच्या भावात आज मोठ्या प्रमाणात घट झाली. घरगुती सराफा बाजारात आज सोन्याचे दर प्रती १० ग्रॅम १ हजार ३१७ रुपयांनी कमी झाले. चांदीच्या दरात प्रतिकिलो २ हजार ९४३ रुपयांचि घट झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत आज सोन्याचा भाव ५४ हजार ७६३ रुपये प्रति दहा ग्रॅम व चांदीचा दर ७३ हजार ६०० रुपये प्रति किलो राहिला.
डॉलरच्या तुलनेत रुपयाची मजबुती सोबत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत घट झाली. त्यामुळे भारतीय सराफा बाजारात ही सोन्याचे मुल्य कमी झाले. सोमवारी बाजारात सोन्याचा भाव प्रती दहा ग्रॅमसाठी ५६ हजार ८० रुपये इतका होता. आज या भावात तब्बल १ हजार ३१७ रुपयांची घट झाली. तो भाव ५४ हजार ७६३ रुपये एतका झाला. सोमवारी चांदीचा भाव प्रतिकिलो ७६ हजार ५४३ रुपये प्रति किलो होता. आज त्या भावात दोन हजार ९४३ रुपयांची घट झाली. तो भाव ७३ हजार ६०० रुपये एवढा झाला.