मेष : शत्रूचे वर्चस्व प्रभावहीन होईल. जोखमीच्या कामात गुंतवणूक टाळा. आर्थिक सुधारणा होईल.
वृषभ : वेळ आनंदाने व्यतीत होईल. महत्वाची कामे वेळेवर पुर्ण होतील. मित्रांचे सहकार्य मिळेल.
मिथुन : आरोप-प्रत्यारोपांपासून चार हात लांबच राहणे योग्य ठरेल. जेष्ठांचा सल्ला घेवून कामे करा.
कर्क : मनावर ताबा ठेवून व्यावहारीक निर्णय घ्या. इच्छित कामात यश मिळण्याची शक्यता आहे.
सिंह : पारिवारिक वातावरण सुखासमाधानाचे राहील. धार्मिक कामात पैसे खर्च होण्याची शक्यता.
कन्या : भावनेच्या भरात जावून कोणतेही काम करु नका. संमिश्र दिवस राहील.
तूळ : मध्यम स्वरुपाची कामे पुर्णत्वास जातील. कमी अधिक प्रमाणात प्रवासाचे योग आहेत.
वृश्चिक : मित्रांच्या मदतीने काही आवश्यक कामे पुर्ण होतील. एखादी चांगली बातमी कानावर येवू शकते.
धनु : नोकरीत वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. काळजीपुर्वक कामे पार पाडा. हितशत्रूचा प्रभाव कमी होईल.
मकर : व्यापारात चांगली परिस्थिती राहील. कुठलीही जोखीम टाळा.
कुंभ : आरोग्य चांगले राहील. अडकलेली कामे मार्गी लागतील.
मीन : व्यवहारात सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. खर्च वाढण्याची शक्यता.