सामुहिक अत्याचार प्रकरणी तिघे अटकेत धावत्या कारमध्ये अल्पवयीन मुलीवर झाला होता अत्याचार

On: August 11, 2020 10:26 PM

मुंबई : पंधरा वर्षाच्या मुलीचे अपहरण करत तिच्यावर धावत्या कारमध्ये अत्याचार केल्याची खळबळजनक घटना 29 जुलै रोजी मुंबई परिसरात घडली होती. या घटनेमुळे मुंबई परिसरात खळबळ माजली होती. या घटनेप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तिघे आरोपी घटनेच्या दिवशी २९ जुलै रोजी सायंकाळी कारमधे फिरायला गेले होते. त्यावेळी त्यांनी १५ वर्षांच्या मुलीला त्यांच्या ताब्यातील कारमध्ये बळजबरी बसवले होते. त्यानंतर त्यांनी तिच्यावर अत्याचार केला होता.

अत्याचारानंतर नराधमांनी पिडीतेला ईस्टर्न फ्री-वेवर सोडून पलायन केले होते. घटनेनंतर पीडित तरुणीने घडलेला सर्व प्रकार तिच्या काकुला कथन केला होता. त्यानुसार पीडितेच्या परिवाराने पोलिसात जावून रितसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी फ्री-वेवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तिघा आरोपींना पकडले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment