आजचे राशी भविष्य (22/10/2022)

मेष : आजचा दिवस आव्हानात्मक असून धावपळ दगदग संभवते. हळूहळू परिस्थिती नियंत्रणात येईल.

वृषभ : घाईचा निर्णय घेवू नये. कालांतराने यशासह प्रगतीचा मार्ग आपोआप प्रशस्त होईल.

मिथुन : व्यवसायिकांना चांगला दिवस. आर्थिक पातळी समाधानकारक राहिल. मानसिक स्वास्थ लाभेल.

कर्क : एखादा महत्वाचा निर्णय घ्याल. जनसंपर्क आणि प्रभाव वाढेल.

सिंह : सुसंवादातून प्रश्न सुटतील. चांगल्या कामासाठी खर्च होईल. नव्या ओळखी होतील.

कन्या : जेष्ठ नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळेल. मित्रांच्या मदतीने काही कामे मार्गी लागतील.

तुळ : श्रमाच्या तुलनेत मोबदला कमी अशी अवस्था होवू शकते. कुटूंबासाठी घेतलेला निर्णय योग्य ठरेल.

वृश्चिक : वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. नोकरदारांना दिलासादायक दिवस राहील.

धनु : कामे सुरळीत पार पडतील. एखाद्या शुभ कार्यात सहभाग घडेल.

मकर : आजचा दिवस फलदायक राहील. स्थावर मालमत्तेचे वाद संपुष्टात येवू शकतात.

कुंभ : लाभाच्या चांगल्या संधी प्राप्त होतील. मेहनतीचा योग्य मोबदला मिळेल.

मीन : मिळकतीचे नविन स्रोत निर्माण होतील. दिवस चांगला राहिल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here