डीएसके परिवार येणार तुरुंगातून बाहेर मुलीचे तेरावे आटोपून पुन्हा जाणार आत

डीएसके परिवार येणार तुरुंगातून बाहेर मुलीचे तेरावे आटोपून पुन्हा जाणार आत

पुणे : कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा कारागृहातील बांधकाम व्यवसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) आणि परिवार काही तासांसाठी तुरुंगातून बाहेर येणार आहेत. मुलीच्या तेराव्यास हजर राहण्यासाठी विशेष न्यायालयाने त्यांना तशी परवानगी दिली आहे. सत्र न्यायाधीश जे.एन. राजे यांनी तसा आदेश दिला आहे. तब्बल अडीच वर्षांनंतर कुलकर्णी परिवार काही तासांसाठी तुरुंगांच्या बाहेरची हवा घेणार आहेत.

डीएसके यांची मुलगी अश्विनी देशपांडे या कोरोनाने बाधीत झाल्या होत्या. उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. मुलीच्या तेराव्याला जाण्यास परवानगी मिळण्यासाठी डीएसके परिवाराने रितसर अर्ज  न्यायालयात सादर केला होता. या अर्जाच्या सुनावणीअंती तिघांना १६ ऑगस्ट रोजी मुलीच्या तेराव्याच्या कार्यक्रमाला काही तास हजर राहण्यास परवानगी दिली गेली आहे. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर पुर्ण वेळ त्यांच्यासमवेत पोलिस पथक पहा-यावर राहणार आहे. १७ फेब्रुवारी २०१८ रोजी पुणे पोलिसांनी डीएसके अर्थात कुलकर्णी परिवारास दिल्ली येथील हॉटेलातून अटक केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here