जळगाव : रिक्षा चोरीच्या दाखल गुन्ह्यातील दोघा आरोपींना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने यापुर्वीच अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींच्या तिस-या फरार साथीदारास देखील अटक करण्यात आली आहे. रिजवान उर्फ काल्या शेख गयासोद्दीन शेख रा. अजमेरी गल्ली तांबापुरा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
1 ऑक्टोबर 2022 रोजी जाकीर बिस्मिल्ला बागवान या तरुणाच्या मालकीची प्रवासी रिक्षा चोरी झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाअंती अनिल रमेश चौधरी आणि मोहसीन शहा सिकंदर शहा या दोघांना चोरीच्या रिक्षासह अटक करण्यात आली होती. अटकेतील दोघांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या तिस-या साथीदाराचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे उघडकीस आले होते. गुन्हा घडल्यापासून तो फरार होता. पोलिस त्याच्या मागावर होते.
पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सहायक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, नाना तायडे, योगेश बारी, साईनाथ मुंढे, मुकेश पाटील आदींच्या पथकाने रिजवान यास जळगाव शहरातून अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला विस गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे. त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याच्याकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.