कोट्यावधी रुपयात स्टेट बॅंकेची फसवणूक – भुसावळला दोन गुन्हे दाखल

जळगाव : कोट्यावधी रुपयात स्टेट बॅंक ऑफ इंडीयाची फसवणूक झाल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 1 कोटी 37 लाख 99 हजार 300 रुपयांचा एक आणि 1 कोटी 40 लाख 1 हजार रुपयात फसवणूक झाल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ शहरातील स्टेट बॅंकेच्या आनंद नगर शाखेत झालेल्या या फसवणूक प्रकरणी मनोज प्रेमदास बेलेकर यांनी वेगवेगळ्या फिर्याद दाखल केल्या आहेत. एका गुन्ह्यात तत्कालीन शाखा व्यवस्थापक नंदलाल पाटील, व्हॅल्युअर अशोक दहाड रा. जळगाव आणि समीर बेले तसेच दुस-या गुन्ह्यात तत्कालीन शाखा व्यवस्थापक विशाल इंगळे आणि व्हॅल्युअर एस.एम.शिंदे यांच्यासह इतरांचा संशयीत आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे.

गृहकर्ज घेण्यास पात्र नसतांना 1 कोटी 37 लाख 99 हजार 300 रुपयांचे संगनमत करुन देण्यात आलेल्या कर्ज प्रकरणी दाखल गुन्ह्यात गफ्फार अली मोहम्मद, तौफिक खान महेमुद खान, तौसिफ खान महेमुद खान, रईसाबी गंभीर शाह, निलोफरबी तौफीक खान, कौसर खान यासीन खान, यास्मिन बी अजीज खान, तनवीर फत्तु तडवी, पुनम भिमराव जाधव सर्व रा. भुसावळ तसेच एसबीआय बॅंक व्यवस्थापक नंदलाल पाटील रा. नागपूर, बॅंकेचे व्हॅल्युअर अशोक दहाड रा. जळगाव, एस.एम.शिंदे समीर बेले रा. नाशिक आदींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशाच स्वरुपाच्या दुस-या गुन्ह्यात महेश देवीदास तायडे, प्रतिभा गोपाळ सोनवणे, हबीब शाह गंभीर शाह, जितेंद्र गंगाधर पाटील, सुलतानबी अहमद कुरेशी, फरजानाबी महेमुद खान पठाण, गणेश किसन तेली, वैशाली किसन तेली, शोएब रजा शेख साजीद, हसिनाबी अब्बास शहा, नदीम खान सुलतान खान, बॅंक व्यवस्थापक विशाल इंगळे, व्हॅल्युअर एस.एम.शिंदे आदींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला अअहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here