जळगाव : पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला कार्यरत हेड कॉन्स्टेबलच्या सांगण्यावरुन चार हजार रुपयांची लाच स्विकारणा-या चहा टपरी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुकलाल शांताराम पाटील असे चार हजार रुपयांची लाच स्विकारणा-या चहा टपरी चालकाचे नाव आहे.
तक्रारदाराने त्याच्या मालकीच्या बैलगाड्या पिंपळगाव हरेश्वर येथील एका इसमास भाडे तत्वावर दिल्या होत्या. बैलगाड्या भाड्याने घेणारा इसम तक्रारदारास त्याच्या बैलगाड्यांचे भाडे देत नव्हता. त्यामुळे तक्रारदाराने याबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला तक्रारी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जाची चौकशी व कारवाई करण्याची जबाबदारी पो.हे.कॉ. राकेश दत्तात्रय खोंडे यांच्यावर निश्चीत करण्यात आली होती. या तक्रारीचा निपटारा करुन तक्रारदारास त्याची थकलेली भाडे रक्कम काढून देण्याकामी हे.कॉ. खोंडे यांनी पाच हजार रुपयांची लाच मागण्याची व स्विकारण्याची जबाबदारी चहा टपरी चालक सुकलाल शांताराम पाटील यांच्यावर टाकली होती.
हे.कॉ. राकेश खोंडे यांच्या सांगण्यावरुन ठरलेल्या पाच हजार रुपयांपैकी चार हजार रुपयांची लाच चहा टपरीवर स्विकारल्याप्रकरणी एसीबी पथकाने सुकलाल पाटील रा. पाचोरा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. डिवायएसपी शशिकांत एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संजोग बच्छाव, एन.एन.जाधव स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.बाळु मराठे, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.