जळगाव : फळे विक्री करण्यास जागा देण्याच्या बहाण्याने तरुणीस बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी वरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुकदेव राज मुळ रा. जम्मू काश्मिर ह.मु. डिएससी लाईन ऑर्डनन्स फॅक्ट्री वरणगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
या घटनेतील 32 वर्षाची तरुणी मथुरा उत्तर प्रदेशातील रहिवासी असून बल्लमगढ जिल्हा फरिदाबाद – हरियाणा येथे राहते. तिला फळे विक्री करण्यासाठी जागा हवी होती. तिची गरज हेरुन सुकदेव राज याने तिला फळे विक्री करण्यासाठी जागा देण्याचे आमिष दाखवले. जागा देतो असे सांगून त्याने तिला वरणगाव फॅक्ट्री परिसरात एका मंदीराजवळ असलेल्या खोलीत बोलावले. त्याठिकाणी त्याने तिच्यावर जबरी अत्याचार केला. तिने आरडाओरड केली असता तिला जीवे ठार करण्याची धमकी देत तो पळून गेला.
पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार वरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सुकदेव राज यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक परशुराम दळवी करत आहे.





