कुंटणखाना आत कंपनीचे नाव बाहेर; शहर पोलिसांनी दिला छाप्याचा आहेर

जळगाव : जळगाव शहराचा केंद्रबिंदू समजल्या जाणा-या गोलाणी मार्केट परिसरात एका गल्लीत सुरु असलेल्या कुंटणखान्यावर जळगाव शहर पोलिसांच्या पथकाने आज दुपारी छापा टाकला. या छाप्यामुळे नवीपेठ, गोलाणी मार्केट परिसरात खळबळ उडाली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात सुरु असलेला कुंटणखाना आजपर्यंत कुणाच्याही नजरेस पडला नव्हता. मात्र पोलिसांच्या छाप्यामुळे हा प्रकार उघड झाला आहे.

जळगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांना याबाबत माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे खात्री करण्यासाठी एक पंटर प्रशिक्षण देवून रवाना करण्यात आला. पंटर आत गेल्यानंतर मालकीनबाईने त्याला पाच महिला दाखवल्या. त्यातील एका महिलेची त्याने निवड केली. याठिकाणी खरोखर कुंटणखाना चालवला जातो याची खात्री झाल्यानंतर विशीष्ट संकेत करुन त्याने पोलिसांना नियोजनबद्धरित्या माहिती दिली.

माहिती मिळताच परिसरात दबा धरुन बसलेल्या पोलिस पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. यावेळी एक मालकीन व पाच अशा एकुण सहा महिलांना ताब्यात घेण्यात आले. या छापा कारवाईत पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांच्यासह त्यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक पोटे, ठाकरे,बोरसे, बडगुजर व महिला कर्मचा-यांनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here