जळगाव : सोन्याचा खरा कॉईन दाखवत विश्वास संपादन केल्यानंतर साडेनऊ लाख रुपयात सौदा करुन चारशे नग नकली कॉईन देत फसवणूक केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश दत्तुजी भोंगडे असे फसवणूक झालेल्या नागपूर येथील तरुणाचे नाव आहे. मुक्ताईनगर पोलिस स्टेशन हद्दीत झालेल्या या फसवणूकीत नागपूरच्या कुणाल किशोर मुलमुल व त्याच्या तिघा साथिदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मुक्ताईनगर येथील पुर्णाड फाट्यापासून सुमारे अर्धा किमी अंतरावर डोलारखेडा रस्त्यावर 8 ऑक्टोबर रोजी दिनेश दत्तुजी भोंगडे याचा किशोर मुलमुल याच्यासह त्याच्या तिघा साथिदारंसोबत सौदा झाला होता. किशोर मुलमुल व त्याच्या तिघा साथीदारांनी दिनेश भोंगडे यास सुरुवातीला एक असली सोन्याचा कॉईन दाखवला. असली सोन्याच्या कॉईन दाखवून दिनेशचा विश्वास संपादन करण्यात किशोर मुलमुल व त्याचे साथीदार यशस्वी झाले.
त्यानंतर साडेनऊ लाख रुपयात नकली चारशे नग कॉईन दिनेशला देवून चौघे फरार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दिनेश भोंगडे याने मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला चौघांविरुध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उप निरीक्षक राहुल बोरकर पुढील तपास करत आहेत.