जळगाव : पती पत्नीचे खासगी फोटो आपल्या व्हाट्सअँप स्टेटस वर ठेवून त्यावर अश्लील कमेंट करणाऱ्या पारोळा येथील महिलेविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव येथील महिलेने याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार माहिती व तंत्रज्ञान कायद्यासह इतर कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जळगाव रामानंद नगर हद्दीतील महिलेचे तिच्या पतीसोबत असलेले अर्धनग्न फोटो पारोळा येथील महिलेने तिच्या व्हाट्स अँप स्टेटस वर ठेवून त्याखाली बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केला. सुमार दर्जाची भाषा वापरणाऱ्या महिलेविरुद्ध दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विजय शिंदे करत आहेत.