जळगाव : जळगाव शहरातील बळीराम पेठ भागात राहणाऱ्या प्रौढाकडून त्याच परिसरातील महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्याविरुद्ध शहर पोलिस स्टेशनला विनयभंगासह इतर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तु माझ्या सोबत सबंध ठेवण्यास होकार दे मी तुला सुखी ठेवेल, जर तु मला नकार दिला तर त्याचे परिणाम वाईट होतील अशी संबंधीत महिलेस धमकी देत शिवीगाळ करुन तिला धक्का देत तिचा हात खेचून अंगलट केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तक्रारदार महिलेच्या मागावर असलेल्या संशयिताने अंधाराचा फायदा घेत तिला म्हटले की तू मला किती दुर्लक्षीत करणार आहेस, तु माझ्या सोबस सबंध ठेवण्यास होकार दे मी तुला सुखी ठेवेल असे म्हणत असतांना त्याने तिची ओढणी खेचत धमकी देत पलायन केल्याचा तक्रारीत आरोप करण्यात आला आहे. पोहेकॉ रविंद्र प्रभाकर सोनार पुढील तपास करत आहेत.