घरफोडीच्या गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपीस अटक

जळगाव : जळगाव शहर पोलिसांना घरफोडीच्या गुन्ह्यात हवा असलेला मुख्य फरार आरोपी एलसीबी पथकाने अटक केला आहे. फिरोज नुर मोहम्मद शहा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

शिवाजी नगर परिसरातील आनंद नागला यांच्या किराणा दुकानातून 90 हजार रुपयांची चोरी झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासकामात तिघा आरोपींना एलसीबी पथकाने यापूर्वीच अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी फिरोज हा गेल्या चार महिन्यापासून फरार होता. तो पोलिसांच्या अभिलेख्यावरील अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्या विरुद्ध मोबाईल चोरीसह घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

फरार फिरोज हा जळगाव रेल्वे स्टेशन परिसरात आला असल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरिक्षक किसनराव नजनापाटील यांना समजली. त्या माहितीच्या आधारे पोहेकॉ जितेंद्र पाटील, अकरम शेख, महेश महाजन, पोना नितीन बाविस्कर, अविनाश देवरे, ईश्वर पाटील आदींनी त्याचा शोध घेतला. रेल्वे स्टेशनच्या मागील भागात पुलाखाली तो तपास पथकाला गवसला. त्याला अटक करण्यात आली. पुढील तपास जळगाव शहर पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here