चोरीच्या मोटारसायकलसह चोरटा एलसीबीच्या जाळ्यात

On: October 18, 2022 8:22 PM

जळगाव : गरीब शेतकरी बांधवाची शेतीच्या बांधावरुन चोरीस गेलेली मोटार सायकल व ती चोरी करणा-या आरोपीस जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आपली चोरी गेलेली मोटार सायकल गवसल्याने गरीब बळीराजाच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटण्यास वेळ लागला नाही. ईश्वर जगन्नाथ सपकाळे (29) रा. धामणगांव ता.जि. जळगाव असे मोटार सायकल चोरट्याचे नाव आहे. पुढील तपासकामी त्याला जळगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

जळगाव तालुका पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील चोरीची मोटार सायकल इश्वर सपकाळे हा वापरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली. त्या माहितीच्या आधारे मोटार सायकल चोरटा व रेकॉर्डवरील गुन्हेगार ईश्वर जगन्नाथ सपकाळे यास ताब्यात घेण्याकामी एक पथक रवाना करण्यात आले. या पथकात सपोनि जालींदर पळे, पोहेकॉ जितेंद्र पाटील, अकरम शेख, महेश महाजन, पोना नितीन बाविस्कर, पोना अविनाश देवरे आदींचा समावेश करण्यात आला.

तपास पथकाने माग काढून इश्वर यास खोटेनगर बसस्टॉप येथून चोरीच्या मोटार सायकलसह ताब्यात घेत अटक केली. पुढील कारवाईकामी त्याला जळगांव तालुका पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी इश्वर सपकाळे हा पोलिसांच्या रेकॉर्ड वरील गुन्हेगार असुन त्याच्या विरूध्द यापुर्वी देखील मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यातील त्याच्या दुस-या साथीदाराचा शोध सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment