जळगाव पोलिस दलाची कमांड घेणार एम. राजकुमार

जळगाव : जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांची बदली घोषित झाली आहे. त्यांच्या जागी एम. राजकुमार हे लवकरच पदभार स्विकारणार आहेत. नागपूर लोहमार्ग पोलिस अधिक्षक पदाचा कार्यभार सांभाळणारे एम. राजकुमार आता जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षकपदाची धुरा सांभाळणार आहेत.

डॉ. प्रविण मुंडे यांची बदली झाली असली तरी त्यांचे पुढील नियुक्तीचे ठिकाण अद्याप घोषित झालेले नाही. गेल्या महिन्यापासून डॉ. प्रविण मुंडे यांच्या बदलीच्या बातम्या येत होत्या. कडक शिस्तीचा अवलंब असणारे अधिकारी अशी एम. राजकुमार यांची ओळख आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here