चोरीच्या मोटार सायकलसह तिघांना अटक

On: October 21, 2022 7:04 PM

जळगाव : चोरी गेलेल्या मोटारसायकलसह तिघा गुन्हेगारांना पारोळा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आलेली मोटार सायकल न्यायालयाच्या आदेशाने मुळ फिर्यादीस परत देण्यात आली.

अनिल नारायण लोहार रा. लोहारगल्ली पारोळा यांची मोटार सायकल त्यांच्या घराच्या अंगणातून चोरी झाली होती. या घटनेप्रकरणी पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. पो.नि. रामदास वाकोडे व त्यांचे सहकारी या गुन्ह्याचा तपास करत होते.

सचिन पंडीत चोधरी व स्वामी उर्फ सुरेंद्र लक्ष्मण चौधरी रा. पारोळा शेवडे गल्ली या दोघांनी मोटार सायकलची चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. दोघांना चौकशीकामी ताब्यात घेतले असता त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. दोघांना अटक करण्यात आली. चोरीची मोटार सायकल धुळे येथील निखील राजेंद्र चौधरी या तरुणास विकल्याचे दोघांनी कबुल केले. त्यामुळे त्याला देखील मोटार सायकलसह अटक करण्यात आली. न्या. के.ले.माने यांच्या आदेशाने गुन्ह्यात निष्पन्न झालेली मोटार सायकल तक्रारदारास परत देण्यात आली. यावेळी पो.नि. रामदास वाकोडे व त्यांचे सहकारी हे.कॉ. नाना पवार, आम्रपाली पालवे हजर होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment