जळगाव : अश्लिल व्हिडीओ बघून त्यामधे दाखवण्यात आलेल्या दृश्याप्रमाणे शरीरसंबंध करण्याची सक्ती करुन त्रास देणा-या पतीविरुद्ध मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार येथील सासर असलेल्या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला तिच्या पतीसह सासरकडील एकुण सहा जणांविरुद्ध स्त्री अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पिडीत विवाहितेचे लग्न डिसेंबर 2020 मधे झाले असून लग्नानंतर पतीसह इतर नातेवाईकांनी तिचा विविध कारणांनी छ्ळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय तिचा पती मोबाईलमधे अश्लिल व्हिडीओ बघून त्यात दाखवलेल्या प्रसंगाप्रमाणे शरीरसंबंध करण्यासाठी आपल्याला त्रास देत असल्याचे पिडीतेने फिर्यादीत म्हटले आहे. महिला पोलिस उप निरीक्षक तडवी पुढील तपास करत आहेत.