तरुणीच्या फोटोला अश्लिल रुप देत केली बदनामी

जळगाव : तरुणीच्या मुळ फोटोत बदल करुन तो अश्लिल फोटोसोबत एडीट करुन काही मित्र मैत्रीणींना पाठवणा-या अज्ञात तरुणाविरुद्ध सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील रिंगरोड परिसरात राहणा-या 26 वर्षाच्या तरुणीच्या फोटोसोबत अज्ञात इसमाने छेडछाड करुन त्याला अश्लिल रुप देत तो फोटो तिच्यासह तिच्या मित्र मैत्रीणींना व्हाटसअ‍ॅप द्वारे पाठवला. अजून व्हायरल न करण्यासाठी तसेच बदनामी टाळण्यासाठी त्या अज्ञाताने तिला खंडणीची मागणी देखील केली. पिडीत तरुणीने सायबर पोलिस स्टेशनला धाव घेत त्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here