जळगावला तरुणाचा खून

जळगाव : फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या झाल्याची घटना जळगाव शहराच्या तांबापुरा परिसरात 25 ऑक्टोबर मंगळवारच्या रात्री 9 ते 9.30 दरम्यान घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत परिस्थीतीवर नियंत्रण मिळवत पुढील कारवाईला सुरुवात केली.

संजयसिंग प्रदीपसिंग टाक असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेत चौघे तरुण जखमी झाले आहेत. याप्रकरणी जसवंतसिंग आयसिंग टाक याने दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गु.र.न.769/22 भा.द.वि. 302, 307, 326, 143, 147, 148, 149 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here