तरुणीचा फोटो स्टेटसला ठेवत तरुणाने केला विनयभंग

On: October 27, 2022 10:07 AM

जळगाव : गावातील तरुणीचा फोटो आपल्या मोबाईलच्या स्टेटसवर ठेवत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुषण मनोहर पाटील रा. कोठली ता. भडगाव असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

भुषण मनोहर पाटील या रा. कोठली ता. भडगाव येथील तरुणाने गावातीलच एका 33 वर्ष वयाच्या तरुणीचा फोटो आपल्या मोबाईल स्टेटसवर ठेवला होता. हा प्रकार तरुणीच्या लक्षात आला असता ती त्याला जाब विचारण्यास गेली. त्यावेळी भुषण याने तिचा हात धरुन तु मला आवडते. तुझा चेहरा सतत माझ्या नजरेसमोर दिसतो असे बोलून विनयभंग केल्याचा तरुणीचा आरोप आहे. याशिवाय तरुणी शेतात कामाला जात असतांना त्याने तिचा पाठलाग करुन तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केल्याचा देखील तरुणीने आरोप केला आहे.

याप्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार भडगाव पोलिसात भुषण मनोहर पाटील याच्याविरुद्ध गु.र.न.298/22 भा.द.वि. 354, 354(ड), 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फौजदार केलास गिते करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment