अमळनेरला घरफोडी – गुन्हा दाखल

On: October 27, 2022 10:57 AM

जळगाव : अमळनेर शहरातील कलागुरु नगर परिसरातील घरफोडी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घरफोडीत रोख 13 हजार रुपयांसह एकुण 73 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला आहे.

अमळनेर येथील कलागुरु नगरात विजय तुकाराम पाटील हे वायरमन भाड्याच्या घरात राहतात. 25 ऑक्टोबरच्या रात्री ते 26 ऑक्टोबरच्या सकाळ दरम्यान घडलेल्या या घरफोडीच्या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत 60 हजार रुपये किमतीची विस ग्रॅम वजनची सोन्याची चेन, लहान मुलाचा चांदीचा करदोडा, हातात घालण्याचे कडे व पायातील पैंजण व रोख 13 हजार या मुद्देमालाचा समावेश आहे.

घटनास्थळाला सहायक पोलिस निरीक्षक राकेशसिंग परदेशी यांनी भेट दिली. गु.र.न.498/22 भा.द.वि. 457, 380 नुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास हे.कॉ. चंद्रकांत पाटील करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment