टेलरकडे जाते असे सांगून गेलेली विवाहिता झाली बेपत्ता

On: October 27, 2022 11:32 AM

जळगाव : टेलरकडे असलेले कपडे घेवून येते असे सांगत घरातून गेलेली 24 वर्ष वयाची विवाहित तरुणी बेपत्ता झाली आहे. शिरसोली गावातून बेपत्ता झालेल्या या विवाहितेच्या पतीने एमआयडीसी पोलिस स्टेशनला मिसींग दाखल केली आहे.

शिरसोली प्र.न. गावातील बेपत्ता झालेल्या विवाहितेचा रंग गोरा, उंची 165 से.मी. असून तिने अंगात पोपटी रंगाचा पंजाबी ड्रेस घातला आहे. हे.कॉ. जितेंद्र राठोड पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment