पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा

On: October 28, 2022 8:17 AM

जळगाव : दवाखान्याच्या बिलाबाबत वृत्तपत्रात चुकीची बातमी देण्यासह पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली एमआयडीसी पोलिस स्टेशनला एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार डॉक्टरचा मेहरुण परिसरात दवाखाना असून घटना गेल्या वर्षी 14 एप्रिल 2021 रोजी घडल्याचे म्हटले आहे.

जळगावच्या मेहरुण परिसरात असलेल्या दवाखान्याबाबत एका वृत्तपत्रात चुकीची बातमी दिली तसेच पाच लाख रुपये देवून प्रकरण मिटवून टाका अन्यथा मिडीयामधे अशीच बदनामी करु अशा प्रकारची दोघा अनोळखी व्यक्तींनी आपल्याला धमकी दिल्याचे डॉक्टरने फिर्यादीत म्हटले आहे. बिलाचे पैसे कमी करण्याबाबत झालेल्या वादातून या घटनेप्रकरणी जळगाव तालुक्यातील नाचनखेडा येथील शोहेब पटेल या व्यक्तीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment