साडेचार तोळे वजनाची सोन्याच्या चेनची जबरी चोरी

On: October 28, 2022 8:58 AM


जळगाव : महिलेच्या गळ्यातील नव्वद हजार रुपये किमतीची साडेचार तोळे वजनाची सोन्याची मंगलपोत दोघा मोटार सायकल स्वारांनी तोडून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव – निमखेडी शिवारातील साई विहार कॉलनीतील रहिवासी श्रीमती विजया दिलीप पाटील या गृहीणी 27 ऑक्टोबर रोजी निमखेडी रस्त्याने जात असतांना विना क्रमांकाच्या मोटार सायकलवरील दोघा अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन तोडून पलायन केले. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक नयन पाटील करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment