दोन लाखांचे दागिने चोरीप्रकरणी गुन्हा

On: October 28, 2022 10:02 AM

जळगाव : वृद्ध महिलेजवळ असलेल्या कापडी पिशवीतील 2 लाख 11 हजार 200 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. जळगाव शहरातील सुभाष चौक सुभाष डेअरीसमोर घडलेल्या घडलेल्या या घटनेप्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

22 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीच्या दिवशी जळगाव तालुक्यातील कठोरा येथील यशोदा संतोष कोळी या सत्तर वर्ष वयाच्या वृद्धा खरेदीनिमीत्त जळगावला आल्या होत्या. दरम्यान दुपारी साडेतीन ते पावणेचार वाजेच्या दरम्यान त्यांच्याकडील कापडी पिशवीतील लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने पाळत ठेवून चोरुन नेले. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास हे.कॉ. परिष जाधव करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment