आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा

On: October 29, 2022 8:13 AM

जळगाव : विवाहितेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली धरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धरणगाव येथील हनुमाननगर परिसरातील डिंपल निलेश महाजन या विवाहितेने 27 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती.

विवाहिता डिंपल हिस आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली जितसिंग आनंदसिंग बयस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार धरणगाव पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 340/22 भा.द.वि. 306, 34 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामधे विवाहितेचा पती निलेश अशोक महाजन, सासरे अशोक अभिमन महाजन, सासू सौ निताबाई अशोक महाजन, मोठी नणंद सौ. छाया उर्फ बाळा जितेंद्र महाजन, नणंदोई भाऊ जितेंद्र उर्फ बबलु संभाजी महाजन रा. दोंडाईचा व लहान नणंद सौ. वैशाली उर्फ सोनी वासुदेव देशमुख रा.भवरखेडा आदींचा समावेश आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जिभाऊ पाटील करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment