जळगाव : दोन कार व एक बाईक अशी तीन वाहने जाळल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत सुमारे सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
जळगाव शहरातील सातपुडा हौसिंग सोसायटी गणपती नगर परिसरात मिलन सलामतरय तलरेजा हे व्यावसायिक राहतात. 28 ऑक्टोबर रोजी सकाळी तिन वाजेच्या सुमारास सर्वजण साखरझोपेत असतांना त्यांची किया सेलटोस कंपनीची तसेच शेजा-यांची किया सेलटोस कंपनीची कार व ओला बाईक अशी तिन वाहने अज्ञात व्यक्तीने जाळून नुकसान केले.
हा प्रकार लक्षात येताच मिलन तलरेजा यांनी घटनास्थळी धाव घेत वाहनांवर पाण्याचा मारा करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र दरम्यानच्या काळात वाहनांचे बरेच नुकसान झाले. या घटनेप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला गु.र.न.321/22 भा.द.वि.435, 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक शांताराम पाटील करत आहेत.