आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली संस्थाचालकांविरुद्ध गुन्हा

On: October 30, 2022 10:43 AM

जळगाव : शैक्षणीक संस्थेतील नोकरी कायमस्वरुपी करण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी करणा-या संचालक मंडळाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अमळनेर पोलिस स्टेशनला अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार भावराव पाटील (देवरे) रा. सारबेटे ता. अमळनेर असे आत्महत्या करणा-या तरुणाचे नाव आहे. प्रतिक्षा तुषार देवरे यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपिठाच्या आदेशाने तुषार देवरे यांना ग्रामविकास शिक्षण संस्था मुडी संचलीत सार्वजनीक विद्यालय सारबेटे येथे शिपाई पदावर अनुकंपा तत्वावर नोकरीवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांची बदली शिरुड येथे करण्यात आली होती. नोकरीत कायमस्वरुपी करण्यासाठी संस्थेचे संचालक, सेक्रेटरी, प्रभारी अध्यक्ष व काही संचालक मंडळ व सहकारी तुषार देवरे यांच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी करत होते. या मानसिक त्रासाला कंटाळून तुषार देवरे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप प्रतिक्षा देवरे यांनी केला आहे.

याप्रकरणी रमेश विनायक पाटील अमळनेर, सुनिल पंढरीनाथ पाटील (सेक्रेटरी रा. नाशिक), प्रभारी अध्यक्ष पंजाबराव पांडुरंग पाटील रा. अमळनेर, संचालक जयवंतराव अमृतराव पाटील रा. शिरुड ता. अमळनेर, कमलाकर विनेश पाटील रा. अमळनेर व दिपक चंदन पाटील रा. एलआयसी कॉलनी अमळनेर, शशीकांत रघुनाथ पाटील शिरुड ता. अमळनेर, दिनेश वसंंत पाटील फापोरे ता. अमळनेर, सचिन काटे अमळनेर, शरद शिंदे अमळनेर, अनिल लोटन पाटील (सेवानिवृत्त मुख्याध्यापक) अमळनेर अशा अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.पो.नि. राकेशसिंग परदेशी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment