अल्पवयीन मुलीवर दोघांचा अत्याचार; शनीपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

On: August 13, 2020 8:02 PM
अल्पवयीन मुलीवर दोघांचा अत्यचार

जळगाव : अल्पवयीन मुलीसोबत बळजबरी लैंगीक संबंध प्रस्थापित करतांना त्याच्या साथीदाराने त्या दुष्कृत्याचे मोबाईलमधे फोटो शुट करण्याचा प्रकार केला. काही दिवसांनी फोटो शुट करणा-या साथीदाराने मुलीला फोटोच्या आधारे ब्लॅकमेल करत तिच्यासोबतही तोच गैरप्रकार केला. या प्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला तेजस दिलीप सोनवणे (२०) व चेतन पितांबर सोनार (२०) दोघा मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील एका अल्पवयीन मुलीसोबत घराजवळ राहणा-या तेजस दिलीप सोनवणे याचे प्रेम होते. २८ फेब्रुवारी २०१९ रोजी ती मुलगी रस्त्याने घरी जात होती. त्यावेळी तेजस सोनवणे हा तिला दुचाकीवर बसवून शहराबाहेर असलेल्या कोल्हे हिल्स परिसरात घेवून गेला. त्याठिकाणी तेजस याने तिच्यावर बळजबरी लैंगीक अत्याचार केला.

त्यावेळी तेजसचा मित्र चेतन पितांबर सोनार हा दोघांच्या मागेमागे पोहोचला होता. त्याने त्या कृष्ण कृत्याचे लपून फोटो काढले. तेजसच्या या घृणास्पद कृत्याचा त्या मुलीला राग आला व तिने तेजस सोबत संभाषण बंद केले. या परिस्थितीचा गैर फायदा घेत चेतन पितांबर सोनार याने तिला फेब्रुवारी महिन्यात गाठले. त्या फोटोच्या आधारे ब्लॅकमेल करत तो देखील तिला कोल्हे हिल्स परिसरात घेवून गेला. त्याठिकाणी चेतन याने ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यासोबत दुष्कृत्य केले.

बुधवारी रात्री पिडीत अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरुन शनीपेठ पोलीस स्टेशनला संशयित आरोपी तेजस दिलीप सोनवणे व त्याचा साथीदार चेतन पितांबर सोनार या दोघांविरुध्द बलात्कार व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघे संशयीत आरोपी साथीदार फरार असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment