खा. नवनीत राणा लीलावतीत दाखल होणार

On: August 13, 2020 8:01 PM
खा. नवनीत कौर राणा

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा या पुढील उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना झाल्या आहेत. नवनीत कौर राणा यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांचा उपचार नागपुर येथे सुरु होता. मात्र त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना आता तातडीने मुंबईला रवाना करण्यात येत असल्याचे वृत्त आहे.

मुंबईच्या लीलावती रुग्णालयात नवनीत राणा उपचार घेणार असल्याचे वृत्त पुढे आले आहे. श्वास घेण्यास त्यांना त्रास होत असून त्यांच्या छातीत वेदना होत असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली आहे. कोरोनाची लागन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर खा. राणा यांना सुरुवातीला अमरावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे सहा दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना नागपुर येथील वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

नवनीत राणा यांच्या दोघा मुलांना कोरोना झाल्यामुळे त्यांच्या देखभालीसाठी त्या घरीच रहात होत्या. दरम्यान त्यांना देखील ६ ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. नवनीत राणा यांचे पती आ. रवी राणा यांचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment