इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार 7 ऑगस्ट रोजी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56254 रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर सोन्याच्या दरात सतत सातत्याने घट होत आहे. असोसिएशननुसार, आज सकाळी 24 कॅरेट सोन्याचा भाव 52731 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा होता.
सोने-चांदीच्या दरात झालेली ही घट आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या घसरणीमुळे आहे. 1970 च्या दशकात मंदी आली होती. सन 2008 मध्ये आलेल्या जागतीक मंदीच्या काळातही असेच चित्र दिसून आले होते. गेल्या शुक्रवारपासून सोन्याचे दर कमी होत आहेत. यावेळी सोने जवळपास 4000 रुपयांनी स्वस्त झाले आहे. गेल्या आठवड्यात सोने 56 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेले होते. सोन्याचा दर आता प्रति 10 ग्रॅम साठी 52 हजार रुपयांच्या जवळपास गेला आहे. सोन्याच्या भावात झालेली ही घट ऐतिहासिक समजली जात आहे.
चांदीच्या भावात प्रति किलो 10 हजार रुपयांची घसरण झाली आहे. शुक्रवारी चांदीचा दर किरकोळ बाजारात 76 हजार रुपये प्रति किलोपर्यंत गेला होता. हाच दर आज 66 हजार रुपये किलो झाला आहे. जेव्हा जेव्हा संकट येते, तेव्हा तेव्हा गुंतवणूकदार सोन्यावरच विश्वास ठेवतात. काहीसे असेच 1970 च्या दशकांत आलेल्या मंदीच्या वेळीही पाहायला मिळाले होते. याच प्रकारे 2008मध्ये आलेल्या जागतीक मंदीच्या काळातही दिसून आले होते