अल्पवयीन मुलीसोबत संबंध – तरुणाविरुद्ध गुन्हा

On: November 1, 2022 9:00 AM

जळगाव : मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असून देखील तिला लग्नाचे आमिष दाखवत पळवून नेवून तिच्यासोबत शरीरसंबंध निर्माण करणा-या तरुणाविरुद्ध चोपडा शहर पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलेश दारासिंग पावरा (20) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सुमारे दोन महिन्यापुर्वी गणेश उत्सव दरम्यान विलेश दारासिंग पावरा याने चोपडा तालुक्यातील मजरेहोळ येथे राहणा-या व शिक्षण घेणा-या अल्पवयीन मुलीला भुलथापा देवून तिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण केले. लग्नाचे आमिष दाखवत त्याने तिला नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात तसेच शिरपूर नजीक महादेव दोंदवाडे येथे पळवून नेले. याठिकाणी त्याने तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले.

या घटनेप्रकरणी पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार चोपडा शहर पोलिस स्टेशनला विलेश विरुद्ध भाग 5 गु.र.न. 437/2020 भा.द.वि. 376(1), (अ), 2 (एन), 363 अ, सह बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून सरंक्षण अधिनियम सन 2012 चे कलम 4,8,5 (एल)12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि. संतोष चव्हाण करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment