गर्दीचा गैरफायदा – वृद्धाचे पन्नास हजार रुपये लंपास

On: November 1, 2022 10:18 AM

जळगाव : बॅंकेतून काढलेली अनुदानाची रक्कम ताब्यात घेतल्यानंतर बस स्थानकावर आलेल्या वृद्धाच्या थैलीतून ती रक्कम गर्दीचा फायदा घेत लंपास करणा-या अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर तालुक्यातील दोधवद हिंगोणा येथील वयोवृद्ध सिताराम शंकर धनगर यांच्या अमळनेर येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत सरकारी अनुदान जमा झाले होते. पन्नास हजार रुपयांची रक्कम काढण्यासाठी ते 31 ऑक्टोबर रोजी बॅंकेत गेले होते. बॅकेतून पैसे काढल्यानंतर ते बस स्थानकावर आले. दुपारी तिन वाजेच्या सुमारास हिंगोणा बसमधे बसल्यानंतर त्यांच्याजवळ असलेल्या कापडी पिशवीतील पैसे गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. कुणीतरी चोरट्याने आपल्या ताब्यातील रक्कम चोरल्याची त्यांची खात्री झाली. याप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस नाईक सुनिल महाजन करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment