जळगाव : जळगाव शहरातील रिंगरोड परिसरातील हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज या भव्य शो रुममधून झालेल्या चोरीप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकुण 1 लाख 2 हजार 659 रुपयांचा मुद्देमाल 21 ते 23 ऑक्टोबर 2022 दरम्यान चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. अभिषेक सुनिल बाफना यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.
रिंगरोड वरील पिपल्स बॅंकेशेजारी असलेल्या या सोन्या चांदीच्या शो रुममधून झालेल्या चोरीच्या घटनेत सोने व डायमंडचा समावेश असलेले मंगळसुत्र, सोने व डायमंडचा समावेश असलेल्या लेडीज अंगठ्या आदींचा समावेश आहे. या चोरीचा तपास स.पो.नि. किशोर पवार करत आहेत.