एकाच सिटवर प्रेमी युगुलाची बुकींग – मामाची प्रियकराला मारहाण

On: November 3, 2022 8:34 AM

जळगाव : पुण्याला जाणा-या ट्रॅव्हल्समधे आपल्या भाचीने तिच्या प्रियकरासोबत एकाच सिटवर बुकींग केल्याचे लक्षात येताच मामाने आपल्या साथीदारांसह प्रियकराला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मामा व साथीदारांविरुद्ध जामनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ तालुक्यातील तपतकठोरा येथील तरुणाचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध सुरु आहेत. पुणे येथे जाणा-या ट्रॅव्हल्समधे आपली भाची व तिचा प्रियकर असलेला तरुण या दोघांचे एकाच सिटवर बुकींग झाल्याचे मामाच्या लक्षात आले. हा प्रकार लक्षात येताच मामाने भाचीच्या प्रियकरास आपल्या साथीदारांच्या मदतीने लाकडी काठीने हातावर आणि पाठीवर मारहाण केली. आज तुला व तिला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याचा आरोप तरुणाने दिलेल्या फिर्यादीत केला आहे. या घटनेचा पुढील तपास हे.कॉ. रियाज गयास शेख करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment