जळगाव : अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध करुन त्या घटनेचे मोबाईलमधे कैद केलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देणा-या तरुणाविरुद्ध भुसावळ शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज लोणारी रा. कडू प्लॉट भुसावळ असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
राज लोणारी या तरुणाने भुसावळ शहराच्या तापी नगर भागातील एका फोटो स्टुडीओमधे अल्पवयीन मुलीसोबत गेल्या दोन वर्षापासून वेळोवेळी केला. त्यानंतर मुलीने त्याच्यासोबत मैत्री करण्यास नकार दिला असता घटनेचे मोबाईलमधील फोटो व्हायरल करण्याची राज लोणारी याने तिला धमकी दिली. तिच्यासोबत अंगलट करुन गैरवर्तन केले. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विनोदकुमार गोसावी करत आहेत.