जेडीसीसी बॅंकेच्या शाखेत चोरीचा प्रयत्न – तिजोरीतील रोकड वाचली

On: November 3, 2022 10:08 AM

जळगाव : जेडीसीसी बॅंकेच्या पारोळा तालुक्यातील शेळावे बुद्रुक शाखेत 1 व 2 नोव्हेंबरच्या दरम्यान रात्रीच्या वेळी रोकड लुटीचा प्रयत्न झाला. मात्र तिजोरी उघडता न आल्याने त्यातील रोकड सुरक्षीत राहिली. मात्र चोरट्यांनी बॅंकेच्या लोखंडी कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकून पोबारा केल्याचे उघडकीस आले आहे.

2 नोव्हेंबरच्या सकाळी बॅंकेच्या मुख्य दरवाज्याचे कुलुप व कडीकोंडा तुटल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती पारोळा पोलिस स्टेशनला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पो.नि. रामदास वाकोडे यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळी धाव घेतली. शाखा व्यवस्थापक जिजाबराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पारोळा पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment