जळगाव : सावदा पोलिस स्टेशनचे स.पो.नि.देविदास इंगोले यांच्यासह त्यांचे सहकारी पोलिस उप निरीक्षक समाधान गायकवाड यांना सशर्त जामीन मंजुर करण्यात आला आहे.
लाचेची मागणी केल्याच्या तक्रारीवरुन दोघा अधिका-यांना एसीबीच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते. दरम्यान दोघांना एक दिवस कोठडी सुनावण्यात आली होती. दोघांना आज भुसावळ न्यायालयात हजर केले असता अटी शर्थीच्या अधिन राहून 15 हजार रुपयांच्या जाचमुचलक्यावर जामीन मंजुर करण्यात आला आहे.







