माजी आमदार जगवाणी यांच्यासह सात जणांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा

जळगाव : बनावट कागदपत्रांच्या आधारे जळगावच्या पिंप्राळा शिवारातील एक हेक्टर 69 आर या भुखंडाची खरेदी विक्री केल्याप्रकरणी माजी आमदार गुरुमुख जगवाणी यांच्यासह एकुण सात जणांविरोधात जळगाव तालुका पोलिस स्टेशनला फसवणूकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अशोक नामदेव राणे (भोईटे नगर जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माजी आ. गुरुमुख जगवाणी यांच्यासह अजगर अजीज पटेल रा. भादली बुद्रुक, हरिष मतवाणी, निलेश भंगाळे, विठ्ठल गलाजी सोळुंके व एच.ए. लोकचंदाणी (सर्व रा. जळगाव) आदींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here