जामीन नामंजूर झाल्याचा संताप – खिळा गिळून आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

On: November 4, 2022 8:37 AM

जळगाव : न्यायालयाने जामीन नामंजूर केल्याचे समजताच जेलच्या भिंतीवरील खिळा गिळून आत्महत्येचा प्रयत्न करणा-या आरोपीविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन पितांबर सोनार (26) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

तुरुंग अधिकारी संतोष पोपटराव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते कर्तव्यावर असतांना चेतन सोनार याचा जामीन न्यायालयाने नामंजूर केल्याचे समजल्यानंतर त्याने जेलच्या बॅरेक भिंतीवरील खिळा गिळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. भा.द.वि. 309 नुसार जिल्हापेठ पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. राजेंद्र पवार करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment