चोरीच्या दोन मोटार सायकलींसह अल्पवयीन मुलगा ताब्यात

On: November 4, 2022 5:32 PM

जळगाव : साथीदाराच्या मदतीने मोटार सायकल चोरीचा गुन्हा करणारा अल्पवयीन मुलगा एलसीबी पथकाने ताब्यात घेतला असून पुढील तपासकामी त्याला सावदा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सावदा पोलिस स्टेशनला दाखल मोटार सायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

अंजाळा ता. यावल येथील अल्पवयीन मुलगा चोरीच्या मोटार सायकल कमी किमतीत विक्री करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे सहायक फौजदार युनुस शेख इब्राहिम, पोहेकॉ दिपक शांताराम पाटील, पोहेकॉ महेश आत्माराम महाजन, पोना नंदलाल दशरथ पाटील, किरण मोहन धनगर, भगवान तुकाराम पाटील, राहुल बैसाणे, चापोहेका भारत पाटील आदींच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याने आपला गुन्हा कबुल केल्यानंतर त्याच्या ताब्यातून चोरीच्या दोन मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.

सावदा पोलिस स्टेशनला दाखल असलेले मोटार सायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. तेजस सपकाळे (रा. अंजाळा ता. यावल) याच्या मदतीने केले असल्याचे ताब्यातील अल्पवयीन बालकाने कबुल केले. तेजस सपकाळे हा फरार असून पोलिस पथक त्याच्या मागावर आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment