भरकटलेली महिला खाकीच्या मदतीने निवारा केंद्रात

On: November 4, 2022 6:17 PM

जळगाव : पारोळा शहरात भरकटलेल्या महिलेस पो.नि. रामदास वाकोडे व त्यांच्या पथकाने महिला निवारा केंद्रात दाखल करण्यात आले आहे. महिलेच्या बाबतीत एखादा संभाव्य अनुचीत प्रकार घडण्यापुर्वी तिला निवारा केंद्रात दाखल केल्यामुळे पो.नि. रामदास वाकोडे व त्यांचे सहकारी कौतुकास पात्र ठरले आहेत.

पारोळा शहरात एक महिला बेवारसपणे भटकत असल्याची माहिती महिला दक्षता समितीच्या सदस्या सौ. सुवर्णा पाटील व सौ. अन्नपूर्णा पाटील यांनी पो.नि. रामदास वाकोडे यांना दिली. त्य माहितीच्या आधारे पो.नि. वाकोडे यांनी आपले सहकारी स.पो.नि. रवींद्र बागुल, पो. ना. संदीप सातपुते, होमगार्ड चेतन पाटील आदींना घटनास्थळी रवाना केले. पोलिस पथकाने महिलेस तिचे नाव गाव विचारले असता ती व्यवस्थित सांगत नव्हती. ती वेडसर असल्याचे वाटत होते. तिला पो.नि. रामदास वाकोडे यांच्यासमक्ष हजर करण्यात आले.

पो.नि. वाकोडे यांनी तिला पेन व वही देत त्यावर तिचे नाव आणि पत्ता लिहिण्यास सांगितले. तिने तिचे नाव छाया मोहन भिलवेकर (वय 27) पत्ता- नांदूरकला जिल्हा बुऱ्हाणपूर मध्यप्रदेश असे लिहून दिले. या माहितीच्या आधारे मध्य प्रदेशातील खकणार पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिका-यांसोबत संपर्क साधण्यात आला. महिलेच्या नातेवाईकांसोबत संपर्क साधून माहिती देण्यास खकणार पोलिस स्टेशनला कळवण्यात आले. दरम्यानच्या कालावधीत महिलेची पारोळा कुटीर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करुन तिला चोपडा तालुक्यातील वेले येथील अमर सेवा केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment