जळगावातून अडीच लाख रुपयांचा पानमसाला जप्त

On: November 5, 2022 7:17 AM

जळगाव : आरोग्यास अपायकारक व प्रतिबंधीत पान मसाल्याचा विक्रीसाठी केलेला साठा जप्त करण्यात आला असून जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील भिमसिंग मार्केट परिसरातील भरत विनायक बाविस्कर यांच्या पंकज ट्रेडर्स या दुकानावर 4 नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्याच्या कारवाईमुळे पान मसाला विक्रेत्यांमधे खळबळ उडाली आहे.

2 लाख 62 हजार 347 रुपयांचा विविध स्वरुपाच्या पान मसाल्याचे उत्पादन असलेला मुद्देमाल या कारवाईत हस्तगत करण्यात आला. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी रामचंद्र मारोतराव भरकड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय पोटे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment