कुसुंबा येथील तरुण बेपत्ता

On: November 6, 2022 5:10 PM

जळगाव : एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील कुसुंबा येथून तरुण बेपत्ता झाला असून त्याबद्दल कुणाला काही माहीती असल्यास एमआयडीसी पोलिस स्टेशनला 0257-2210500 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गोपाल इश्वर पाटील रा. तुळजाई नगर कुसुंबा असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव असून त्याचे वय 32 वर्ष आहे. बेपत्ता झाला त्यावेळी त्याच्या अंगात नारंगी रंगाचा शर्ट व पांढ-या रंगाची पॅंट होती. रंगाने गोरा, शरीर मजबुत आणि उंची अंदाजे सहा फुट असे त्याचे वर्णन आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment